सुएझ कालव्यात अडकलेलं 'एव्हर गिव्हन' जहाज कसं बाहेर निघालं? । सोपी गोष्ट 304

व्हीडिओ कॅप्शन, सुएझ कालव्यात अडकलेलं 'एव्हर गिव्हन' जहाज कसं बाहेर निघालं? । सोपी गोष्ट 304

दोन लाख टन वजनाचं ‘एव्हरग्रीन’ नावाच्या तैवानी मालवाहतूक कंपनीचं ‘एव्हरगिव्हन’ हे जहाज सोमवारी अखेर सुएझ कालव्यातून मोकळं झालं. साधारण आठवडाभर हे जहाज काव्याच्या दक्षिणेकडच्या टोकाशी अडकून पडल्याने या कालव्यात अक्षरशः ट्रॅफिक जाम झाला होता. या बोटीच्या दोन्ही बाजूने 350 पेक्षा जास्त जहाजं आणि बोटी अडकून पडल्या.

मधल्या काळात जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं. अधिक तपास केल्याशिवाय ही बोट मुळात अडकलीच कशी याचा उलगडा होणार नाही. ही बोट सोडवण्यासाठी काय काय करावं लागलं? यात कुणी महत्त्वाची भूमिका बजावली? पाहूया सोपी गोष्टमध्ये...

संशोधन - टीम बीबीसी, सिद्धनाथ गानू

लेखन,निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)