इलेक्टोरल बाँड्स काळा पैसा राजकारणापासून दूर ठेवू शकतात का?। सोपी गोष्ट 305

2017 मध्ये मोदी सरकारने अर्थसंकल्पात इलेक्टोरल बाँड्स किंवा निवडणूक रोखे घोषित केले. हे बाँड्स राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठीचं एक साधन आहे.

पण राजकीय पक्षांना या बाँड्समार्फत मिळालेल्या देणग्या घोषित न करण्याचं बंधन नाही. तसंच या बाँड्समार्फत कोण देणगी देतंय ते सुद्धा गुप्त ठेवलं जातं. या सगळ्यामुळे राजकारणतील पारदर्शकतेला तडा जातो असा अनेकांचा दावा आहे.

यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो का? सामान्य माणसांवर या सगळ्याचा काय परिणाम होतो? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न.

संशोधन - सिद्धनाथ गानू

लेखन,निवेदन- सिद्धनाथ गानू

एडिटिंग- अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)