सौर ऊर्जेवर चालणारा फ्रिज करणार गरीब देशांना लस साठवायला मदत
जगभरात कोरोना लसीकरणाची मोहीम आता जोर धरू लागली आहे. पण, कोरोनाच्या काही लशी उणे 20 ते अगदी उणे 70 अंश सेल्सिअसपर्यंत साठवणं हे अनेक देशांसाठी आव्हानात्मक आहे. काही देशांत तर 24 तास वीज पुरवठ्याची खात्री नाही. अशा देशांसाठी ड्युलास या कंपनीने सौरउर्जेवर चालणारा फ्रिज विकसित केला आहे.
या फ्रिजमुळे लस साठवणं सोपं होऊन ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांनाही लस वेळेत मिळू शकेल. 92 आफ्रिकन देशांनी लस मिळवणे आणि साठवणे यासाठी सहकार्य करार केला आहे. या देशांची भिस्त या सौरउर्जेवर चालणाऱ्या फ्रिजवरच आहे. पाहूया हा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)