अर्मेनियातल्या ‘या’ शहरात लोक आपल्याच घरांना का आगी लावत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, नागोर्नो-काराबाखच्या ‘या’ शहरात लोक आपल्याच घरांना का आगी लावत आहेत?

नागोर्नो-काराबाख भागात रशियाच्या मध्यसथीने युद्धसंधी झाली. पण, त्यासाठी आर्मेनियन सैन्याला या भागातील दुसऱ्या क्रमांकाचं शहर सोडावं लागणार आहे. सहा आठवड्यानंतर आता युद्ध थांबलंय. आणि केलबझार या शहरातून आर्मेनियन वंशाचे लोक सामूहिकरीत्या बाहेर पडत आहेत.

पण, ते गेल्यानंतर अझेरी लोकांना राहती घरं मिळू नयेत म्हणून आपल्या घरांना ते आगी लावत आहेत. त्यामुळे एकाच वेळी हे शहर उजाडही दिसतंय आणि आगीच्या ज्वाळांनी वेढलेलंही आहे. बीबीसीचे युरी वेन्डिक यांचा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)