चीनमध्ये मंगोलियन लोकांची मातृभाषा दडपण्याचा प्रयत्न होतोय का?

व्हीडिओ कॅप्शन, चीनमध्ये या अल्पसंख्यांक समुदयाच्या मातृभाषा बंदी घालण्याचा प्रयत्न होतोय का?

चीनमधील मंगोलियन लोक आंदोलन करत आहेत. अल्पसंख्यांक समुदयासाठी बांधलेल्या शाळेत हे लोक त्यांच्या मुलांना आता पाठवत नाहीयेत.

कारण या शाळेत त्यांची मातृभाषा वगळून मँडरीन म्हणजेच चिनी भाषेला प्राधान्य दिलं जात आहे.

देशाला एकरूप करण्याच्या नावाखाली चीन सरकार इतर अल्पसंख्यांक समुदयाची संस्कृती आणि परंपरा कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे आरोप चीनने याआधी फेटाळले आहेत.

या दरम्यान नक्की काय परिस्थिती आहे? हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने या भागात दौरा केला. पाहुयात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)