कोरोना व्हायरस विषयीच्या ‘फेक न्यूज’शी लढणारे कोव्हिड योद्धे
जगभरात वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी, शिक्षण पूर्ण न झाल्यामुळे प्रत्यक्ष रुग्णसेवा करू शकत नाहीत.
कोरोनाच्या जागतिक संकटात ही सल जगातील हजारो तरुणांना बोचत होती. पण, असे लोक सोशल मीडियावर एकत्र आले. आणि त्यांनी एक समांतर चळवळ सुरू केली. कोरोनाशी नाही तरी कोरोनाविषयीच्या फेक न्यूजशी लढण्यासाठी त्यांनी #MoreViralThanTheVirus अशी एक चळवळच सुरू केली.
तरुण आणि वृद्धांच्या मनात कोरोना विषयीच्या अनेक गैरसमजुती असतात. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा वापर करून असे गैरसमज आणि फेक न्यूज दूर करण्याचा प्रयत्न ही तरुण मुलं करत आहेत. अशाच जगभरातील काही कार्यकर्त्यांशी बीबीसीने गप्पा मारल्या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)