कोरोना साथीत केरळ मॉडेल का फेल झालं?
कोरोना व्हायरसचा उद्रेक देशात सुरू झाला तेव्हा केरळ राज्यातही मार्च महिन्यात कोरोनाचे काही रुग्ण आढळले. पण, तिथल्या सक्षम सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमुळे काही महिन्यातच इथली रुग्ण संख्या कमी झाली.
देशात कोरोनाशी सामना करण्यासाठी एक नवं मॉडेल तेव्हा उदयाला आलं, ‘केरळ मॉडेल.’ पण, आता लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यावर इथे कोरोनाग्रस्त लोकांची संख्या पुन्हा वाढतेय. शिवाय आखाती देशांमधून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतला. आणि मागच्या आठवड्यातच केरळमध्ये नवीन हजारो रुग्ण वाढले. अशावेळी या नव्या उद्रेकाची कारणं काय आणि तिथल्या व्यवस्थेत कुठल्या त्रुटी आहेत याविषयी बीबीसीचा हा खास रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)