एशना कुट्टी: साडी नेसून हूलाहूप डान्स करणारी मुलगी

व्हीडिओ कॅप्शन, एशना कुट्टीः साडी नेसून हूलाहूप डान्स करणारी मुलगी

सोशल मीडियावर काही लोक अशाप्रकारे झळकतात की ते एका रात्रीत स्टार होऊन जातात. असाच एक व्हीडिओ गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. साडी नेसून आणि स्निकर्स घालून एक मुलगी हूलाहूप डान्स करत आहे. तिचं नावं आहे एशना कुट्टी.

ती ज्या सहजतेनं एकाचवेळी हूलाहूप आणि साडी सांभाळत आहे आणि गाण्याच्या तालात नाचत आहे ते पाहाण्यासाठी लोक हा व्हीडिओ मोठ्या संख्येने पाहात आहेत. तिच्याशी बीबीसीच्या प्रतिनिधी बुशरा शेख यांनी संवाद साधला.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)