संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमागचा अर्थ काय?
महाराष्ट्रात राजकीय बदलांचे वारे वाहतायत का? हा प्रश्न गेल्या दोन दिवसांपासून चर्चिला जातोय. कारणही तसंच आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते तसंच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक भेट झाली.
मुंबईतल्या एका खासगी पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीनंतर शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटींच्या सत्रांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने राजकीय बदलांच्या चर्चांना सुरूवात झाली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)