नरेंद्र मोदी सरकारचा कलम 370 हटवण्याचा निर्णय UN मध्ये का आला चर्चेत? सोपीगोष्ट 173
काश्मीरचा सीमा प्रश्न हा दोन देशांचा अंतर्गत प्रश्न आहे अशी भूमिका भारताने वारंवार मांडली असली तरी काश्मीरचा मुद्दा जसा देशात धगधगतो तसाच तो जगभरातही धगधगत असतो. आता धगधगतोय तो तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष आर्दोआन संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे...
भारताने लगेचच याचा निषेध केला. तर पाकिस्तानने आर्दोआन यांचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय स्तरावर हे राजकारण, तर देशात नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला यांनी एका वर्षानंतर पुन्हा संसदेत पाऊल ठेवलं. आणि मागणी केली काश्मीरला विशेष दर्जा पुन्हा बहाल करण्याची...
थोडक्यात काश्मीर प्रश्न पुन्हा पटलावर आलाय. तेव्हा सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया ताजे अपडेट. आणि काश्मीर प्रश्न असा गाजत ठेवणं कुणाच्या आणि कसं फायद्याचं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)