कोरोना ब्राझील : अॅमेझॉनच्या अतिदुर्गम भागात कोरोनाचा कसा मुकाबला करतोय आदिवासी समाज?

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना ब्राझील – अॅमेझॉनच्या अतिदुर्गम भागात कोरोनाचा कसा मुकाबला करतोय आदिवासी समाज?

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांपैकी एक म्हणजे ब्राझील. पण, इतर देशांच्या तुलनेत ब्राझीलसाठी कोरोना विरोधातील लढा काहीसा वेगळा होता. कारण, अॅमेझॉन जंगल परिसरात राहणाऱ्या अनेक आदिवासी वस्त्या बंदिस्त वातावरणात राहतात.

आपल्या परंपरा आणि संस्कृती टिकवण्याच्या नादात हा समाज लोकांपासून आणि जगरहाटीपासून दूर राहतो. पण, कोरोना त्यांनाही चुकला नाही. बाहेरच्या समाजात न वावरल्यामुळे या लोकांची रोग प्रतिकारशक्तीही क्षीण. अशावेळी हा समाज आणि पर्यायाने ब्राझील प्रशासन कोरोनापासून या समाजाला कसा सुरक्षित ठेवतोय? बीबीसीचा खास रिपोर्ट...

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)