मध्य प्रदेशमधील धरणाचे दरवाजे उघडल्याने महाराष्ट्राला असा बसला पुराचा फटका

व्हीडिओ कॅप्शन, मध्य प्रदेशमधल्या धरणाचे दरवाजे उघडल्याने महाराष्ट्राला कसा बसला पुराचा फटका?

गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पूर आला. पुरामुळे अनेक गावं बुडाली तर अनेकजण बेघर झाले.

गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटरच पाणी आणि वैनगंगा नदीला आलेल्या पुराचं पाणी भंडारा जिल्ह्यातील दवडीपार गावांमध्येही शिरलं. आतापर्यंत तीन जिल्ह्यांतली 76 गावांमधले 18 हजार 192 लोक पूरबाधित झाले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)