कोरोनाच्या संकटात आगीची भर, अॅमेझॉनवासीयांचा जीव गुदमरला

व्हीडिओ कॅप्शन, आधीच कोरोनाचं संकट, त्यातच जंगलातल्या आगीमुळे अॅमेझॉनवासीयांचा जीव गुदमरला

ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढतोच आहे. शहरांबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यातच इथलं जगप्रसिद्ध अँमेझॉन जंगल सध्या धगधगतंय.

कारण, जूनपासून इथं फायर हंगाम सुरू होतो. म्हणजे जंगलाला आग लावून जंगल कमी करण्याचा हंगाम. या आगींमुळे कोव्हिडबरोबरच रुग्णांना श्वसनाचा त्रासही व्हायला लागला आहे.

आधीच आरोग्य यंत्रणेवर कोरोनाचा ताण आहे. त्यातच हे संकट आल्यामुळे प्रशासनाचं धाबं दणाणलं आहे. बीबीसीचा खास रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)