हे शेतकरी पक्ष्यांना दाणे मिळावेत म्हणून करतात शेती- पाहा व्हीडिओ
शेतीनं समाजात खूप बदल घडवले आहेत. त्यामुळे चांगल्या सुधारणा झाल्या आहेत असं काहींना वाटतं. पण या बदलांमुळे आपण बरंच काही गमावलं आहे. भूजल पातळी कमी झाली, जंगल नष्ट झालं. सगळे पक्षी आणि कीटक या बदलांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत. विकासाचं हे चित्र आशादायक नाही.
तुम्ही इथे खूप सारे पक्षी पाहू शकता. जेव्हा खायला दाणा मिळतो, तेव्हा मोठ्या संख्येनं ते येतात. अन्नाचं प्रमाण कमी झालं, की कमी पक्षी येतात. अन्नासाठी त्यांचा शोध सुरु असतो, हे आमच्या लक्षात आलं. मग मी विचार केला, त्यांच्यासाठीच अन्न निर्माण का करून का नये? आपण आपल्यासाठी शेत लावतो, त्यांच्यासाठीही लावूयात. तिथून ही सुरुवात झाली.
पाऊस पडतो तेव्हा मी पक्ष्यांसाठी शेत लावतो. ते कसे येतात आणि रोपांवर बसतात, कसं खातात त्याचं निरीक्षण करतो. कधी कधी ते मला पीक घेऊ देत नाहीत. आधी मी शेताच्या एका कोपऱ्यात त्यांच्यासाठी थोडी बाजरी ठेवायचो. पण लॉकडाऊनमध्ये मी नीट ठरवलं. मी शेताच्या पाव एकरात मका लावला आहे आणि पाव एकरात त्यांच्यासाठी बाजरी लावली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)