You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
या शेतकऱ्याने पिकवली गुजरातच्या वाळवंटात सफरचंदाची बाग
सफरचंदाची बाग म्हटलं की आपल्यासमोर काश्मीरचं दृश्यं आठवतं. पण लवकरच तुम्हाला गुजरातमधल्या कच्छ येथील वाळवंटातून सफरचंद मिळणार आहेत.
कच्छमध्ये आतापर्यंत आंबे, खजूर, डाळिंब आणि इतर फळं घेतली आहेत. पण इथल्या एका शेतकऱ्याने मात्र उष्ण हवामानात सफरचंदाचं पीक घेतलं आहे. सफरचंदला साधारण अती थंड वातावरण पाहिजे असतं. शांतीलाल मवानी हे कच्छमधले शेतकरी आहेत. नखाराना तालुक्यातल्या खिरसारा गावात ते राहतात. गेल्या ५ वर्षांपासून ते कच्छमध्ये सफरचंद पिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एक आव्हानात्मक काम होतं. त्यांना सुरुवातील अपयश हाती लागलं. पण त्यांनी हार मानली नाही. प्रयत्न चालू ठेवले.
व्हीडिओ रिपोर्ट - प्रशांत गुप्ता, प्रीत गराला (बीबीसी गुजराती)
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)