मुंबई पाऊस: सलग आठ तास पावसात मॅनहोलजवळ उभी राहणारी महिला
मुंबईत 4 ऑगस्टपासून पुढे दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. माटुंग्याच्या तुलसी पाईप रोडवर मध्यरात्रीपासून पाणी भरायला सुरवात झाली. कांता मूर्ती कल्लर या 50 वर्षाच्या महिलेने पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोलचं झाकण उघडलं.
कांता माटुंगा भागात गजरे विकण्याचं काम करतात. या रस्त्यावर दुर्घटना होऊ नये म्हणून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सावध करण्यासाठी कांताबाई 8 तास पावसात मॅनहोलजवळ उभ्या राहिल्या.
पावसात स्वत:चं सामान वाहून गेल्यानंतरही जीवाची पर्वा न करता त्यांनी सामाजिक भान जपलं.
कांता मूर्ती यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)