कोरोना संसर्ग: लठ्ठपणा कोव्हिडचा धोका वाढवू शकतो का?
स्थूल लोकांना कोव्हिडचा धोका जास्त आहे असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय.
स्थूल व्यक्तीला कोव्हिड झाल्यास तातडीच्या उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावं लागण्याचा तसंच मृत्यूचा धोकाही जास्त असू शकतो.
एका सर्वेक्षणातून असं दिसून आलंय की युरोपात स्थूलपणाच्या बाबतीत युके नंबर एक वर आहे तसंच लॉकडाऊनच्या काळात व्यायामाचं प्रमाण घटलंय, जंक फूड खाण्याचं आणि मद्यपानाचं प्रमाण वाढलंय. हाच धोका लक्षात घेऊन बोरिस जॉन्सन यांच्या सरकारने स्थूलपणाबद्दल एक नवीन धोरण जाहीर केलंय.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)