चीनमध्ये 30 वर्षांपूर्वी झालेल्या घटनेचं हाँगकाँगमध्ये का स्मरण केलं जातंय?
हाँगकाँग सध्या धुमसतंय. चीनच्या नवीन सुरक्षा कायद्याला इथं कडाडून विरोध होतोय. तसंच 4 जून 1989 मध्ये बीजिंगमधल्या तियानानमेन चौकामध्ये निशस्त्र आंदोलकांवर सैन्याने गोळीबार केला होता.
त्या घटनेचं त्या ठिकाणी स्मरण करण्यात आलं. कोरोनामुळं लोकांना एकत्र येता आलं नसलं तरी ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आले.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)