कोरोनापासून वाचण्यासाठी नेदरलँडच्या शाळेत 'हे' पाच नियम- पाहा व्हीडिओ
कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून अनेक देशांच्या सरकारांनी लॉकडाऊन शिथिल करत शाळा सुरू करायला परवानगी दिली आहे. पण मुलं एकमेकांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोना होईल का, ही भीती अनेक पालकांना वाटतेय.
शिवाय शाळा सुरू झाल्यानंतर संसर्गात वाढ होईल का याबद्दलही चिंता व्यक्त केली जातेय.
नेदरलँडमध्ये प्राथमिक शाळा 11 मे या दिवशी सुरू झाल्या. तीन आठवडे उलटून गेल्यावर काही महिन्यांपूर्वी कोरोनाचा उद्रेक झालेल्या या देशात आता नेमकी काय परिस्थिती आहे, याचा वेध घेण्यासाठी बीबीसीची टीम एका शाळेत पोहचली. पाहूया हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)