'लोकांना वेठबिगारीच्या कचाट्यातून सोडवणं हेच माझं ध्येय'
तामिळनाडूतल्या पाचयाम्मल वीटभट्टीमध्ये वेठबिगार म्हणून काम करायच्या.
सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी मिळून पाचयाम्मल यांची सुटका केली.
सुटका झाल्यानंतर त्यांनी वेठबिगारांच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.
"आम्ही सुटका झालेल्या वेठबिगारांचं पुनर्वसन करायला सुरुवात केली," त्या सांगतात.
"आमच्या संस्थेची चार मुख्य कामं आहेत. वेठबिगारांना ओळखणं. सरकारला त्याची माहिती देणं आणि त्यांची सुटका करणं.
त्यांचं पुनर्वसन करणं आणि त्यांनी पुन्हा वेठबिगारीच्या कचाट्यात अडकू नये यासाठी प्रयत्न करणं. शेवटपर्यंत मी हेच काम करत राहीन."

हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
