BBC आफ्रिका आय एक्सक्लुझिव्ह : नायजेरियात कैद्यांना बेकायदेशीरपणे दिली जातेय अमानुष आणि क्रूर शिक्षा
या व्हीडिओतील काही दृश्यं तुम्हाला विचलित करू शकतील.
ही बातमी आहे नायजेरियात प्रचलित असलेल्या कैद्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेची. खरंतर तिथे छळवणूक विरोधी कायदा अस्तित्वात आहे.
पण, बीबीसी आफ्रिका आयने केलेल्या एका शोध मोहिमेतून असं बाहेर आलंय की, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कैद्यांचा अनन्वित छळ होतो.
आणि त्यासाठी अत्यंत भयानक आणि क्रूर अशी 'ताबे' पद्धत वापरली जाते. कायदा अस्तित्वात असला तरी त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे 'ताबे'सारखी शिक्षा सर्रास सुरू आहे. बीबीसीला एक प्रकरण तर असं सापडलं जिथे नायजेरियन पोलिसात एका अती वरिष्ट पदावर असलेली व्यक्तीवर अशा क्रूर शिक्षेचा वापर केल्याचा आरोप आहे.
मायेनी जोन्स यांचा हा रिपोर्ट पाहूया...
प्रेक्षकांना सूचना आहे की यातली काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
