मेरी कोम : BBC इंडियन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन
सहा वेळा वर्ल्ड अॅमाच्युअर बॉक्सिह चँपियन बनणाऱ्या त्या एकमेव महिला आहेत. मेरी कोम बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या एकमेव महिला खेळाडू आहेत.
मेरी कोम राज्यसभेच्या नामोनिर्देशित सदस्यही आहेत. वर्ल्ड ऑलिम्पक असोसिएशनने त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाआधी OLY (ऑली) ही पदवी लावली आहे.
"सुरुवातीपासूनच मला खेळण्याची प्रचंड आवड होती. माझ्या गावात फुटबॉल खेळणारी मी एकटीच मुलगी होते. मुलांसोबत फुटबॉल खेळणारी मी एकमेव मुलगी होते. ते कोणाला आवडायचं नाही. लोक मला चिडवायचे. पण मी वाद घालायचे की का मी खेळू शकत नाही, खेळण्यासाठी भांडायचे," त्या म्हणतात.
तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.
व्हीडिओ
(रिपोर्टर - वंदना, शुट आणि एडिट - नेहा शर्मा/ वंदना)
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
