लता करे: धावणाऱ्या आजीबाईंची कहाणी मोठ्या पडद्यावर
नऊवारी साडी, सडपातळ बांधा, कपाळावर ठसठशीत कुंकू, कोणत्याही ग्रामीण भागातील महिलेसारखा साधा पेहराव. पण त्याच पेहरावात 68 वर्षांच्या लता करे यांनी बारामतीतल्या मॅरेथॉनमध्ये 3 किलोमीटर अंतराची शर्यत तीन वेळा जिंकली आहे.
या आजीबाईंची कहाणी सांगणारा चित्रपट येत्या 17 जानेवारीला रिलीज होतो आहे. आणि विशेष म्हणजे त्यात लता करे, त्यांचे पती आणि मुलगा त्यांच्या मूळ भूमिकेत दिसणार आहेत.
( रिपोर्टर - हलिमा कुरेशी, एडिट - शरद बढे, निर्मिती - जान्हवी मुळे )
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)