महिला: अनाथ बाळांना दूध पाजणाऱ्या माता म्हणतात, 'ही माझीच मुलं'
काठमांडूच्या एका बालमंदिरात 5 माता अनाथ मुलांना आपलं दूध पाजायला येतात.
त्याठिकाणी 15 अनाथ बाळं आहेत. ज्यांना अंगावरच दूध पाजायला काही महिला येतात. बालमंदिरमध्ये अनाथ मुलांना आईचं दूध पाजण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात पाच महिन्यांपूर्वी झाली.
या बाळांना आपलं दूध पाजणाऱ्या माता दूरवरून येतात. या महिला या कामाला दया आणि पुण्याचं काम समजतात.
काही स्वयंसेवक माता या मुलांसाठी आपलं दूध बाटलीत पाठवतात. बालमंदिर अशा अजून मातांचा शोधात आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)