अॅमेझानच्या जंगलात भीषण आग, ब्राझीलमध्ये भरदिवसा अंधार
अॅमेझानच्या जंगलात तीन आठवड्यांपूर्वी लागलेली आग अजूनही तशीच आहे. या आगीमुळे अॅमेझॉन, रोडांनिया आणि साओ पाओलोमध्ये भरदिवसा अंधार झाला आहे.
आगीममुळे ब्राझीलचं 2700 किमी क्षेत्र प्रभावित झालं आहे. अॅमेझॉनमध्ये लागलेल्या भीषण आगीबाबत फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यान्युएल मॅक्रॉन यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले, "अॅमेझॉनच्या जंगल जगासाठी वरदान आहेत असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या पर्यावरणातला 20 टक्के ऑक्सिजन या जंगलातील झाडांमुळे तयार होतो त्याच ठिकाणी आग लागली आहे," असं ते म्हणाले.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)