ऑफिसमध्ये हाय हिल्स घालायच्या नाही हे बायका ठरवणार की त्यांचे बॉस?
जपानच्या अनेक ऑफिसमध्ये हाय हील्स घालणं सक्तीचं आहे. तिथल्या महिलांनी मात्र याला विरोध केला आहे.
हाय हील्समुळे झालेल्या त्रासाच्या अनेक तक्रारी ऐकल्यानंतर जपानच्या अभिनेत्री आणि लेखिका युमी इशिकावा यांनी त्याच्या विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली.
असं करणं सरळसरळ लैंगिक भेदभाव आहे हे सर्वांना समजायला पाहिजे. याचा आपण विरोध करायलाच पाहिजे, असं युमी इशिकावा सांगतात.
हाय हील्सच्या सक्तीविरोधात युमी यांनी 18 हजार सह्या घेतल्या आहेत. त्यांनी सरकारकडे याबद्दल याचिकाही दाखल केली आहे.
पण कामगार मंत्री टाकुमी नेमोटो यांनी त्यांची याचिका फेटाळली आहे. हाय हील्सचा नियम योग्य आहे असं नेमोटो यांनी म्हटलं आहे.
नेमक प्रकरण काय आहे हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)