या तान्हुलीचं वजन आहे फक्त एका सफरचंदाएवढं...
अमेरिकेतल्या एका हॉस्पिटलमध्ये फक्त 245 ग्रॅम वजन असणाऱ्या मुलीचा जन्म झाला आहे. ही जगातली सर्वांत लहान आकाराची मुलगी असल्याचं म्हटलं जातंय.
या तान्हुलीचं नाव सेबी ठेवण्यात आलंय. जन्माच्या वेळी या छोटुकलीचं वजन एखाद्या मोठ्या सफरचंदाएवढं होतं.
सेबीचा जन्म डिसेंबर 2018ला झाला. सेबी ही प्रिमॅच्युएर बेबी आहे. 23 आठवडे आणि 3 दिवसच ती गर्भात होती. मग तिचा जन्म झाला.
या बाळाच्या जिवंत राहण्याची शक्यता खूपच कमी होती. त्यामुळे तिला कॅलिफोर्नियाच्या सॅन डिएगोमधल्या शार्प मॅरी बर्च हॉस्पिटलच्या नियोनॅटल इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)