चीनमध्ये तियानानमेन चौकातील हिंसाचाराच्या स्मृती आजही का दडपल्या जात आहेत?
तीन दशकांपूर्वी चिनी सरकारनं तियानानमेन चौकात लोकशाहीच्या मागणीसाठी तरुणांनी सुरू केलेलं आंदोलन निर्दयीपणे दडपून टाकलं होतं. 4 जून 1989 च्या मध्यरात्री तियानानमेन चौकात रणगाडे घुसवण्यात आले होते.
2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या काही कागदपत्रांमध्ये तियानानमेन चौकातील हिंसक दडपशाहीमध्ये 10 हजार लोक ठार झाल्याचा उल्लेख होता.
आजही या घटनेबद्दल चीनमध्ये मौन बाळगण्यात येतं. या घटनेच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांना तीन ते साडेतीन वर्षं तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येते. या घटनेच्या स्मृती दडपण्यासारखं ‘त्या’ काळरात्री नेमकं काय घडलं होतं? पाहा व्हीडिओ
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)