ड्रोनने किडनी पाठवल्याचं तुम्ही कधी पाहिलंय का?
अमेरिकेत ड्रोनचा वापर किडनी पाठवण्यासाठी करण्यात आला.
एका रुग्णालयात किडनीची आवश्यकता होती. दुसऱ्या रुग्णालयात किडनी उपलब्ध होती. दोन्ही रुग्णालयातलं अंतर पाच किमी आहे. रुग्णालयाने ती किडनी ड्रोनने पाठवण्याचा निर्णय घेतला.
एका बॉक्समध्ये घालून ही किडनी पाठवण्यात आली. या किडनीच्या सुरक्षेसाठी एक विशेष सिस्टिम विकसित केली आहे. यात काही बिघाड झाला तर त्यावर मात करण्यासाठी अतिरिक्त 8 मोटर्स आहेत. त्याचबरोबर या ड्रोनसोबत एक पॅराशूटही आहे.
सिस्टिम खराब झाली तर बॉक्स खाली आणता येईल हा त्याचा उद्देश आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ मेरिलँडनं हे ड्रोन बनवलं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)