इलेक्ट्रिक कार विकत घेण्याचा विचार करताय? बॅटरी, चार्जिंग, किंमत - अशा प्रश्नांची उत्तरं

व्हीडिओ कॅप्शन, इलेक्ट्रिक कार विकत घेण्याचा विचार करताय? बॅटरी, चार्जिंग, किंमत - अशा प्रश्नांची उत्तरं

भविष्यातील कार इलेक्ट्रिक असेल, असं आता सर्वांना वाटू लागलं आहे. पण नवं तंत्रज्ञान म्हटलं की त्याबरोबर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित राहतातच.

इलेक्ट्रिक कार्सच्या बाबतीतही अनेक शंका आहेत.... त्यांची किंमत, चार्जिंगसाठी लागणारी संसाधनं आणि वेळ, बॅटरीचं तंत्रज्ञान आणि सुरक्षितता.

भारतात तर अद्याप या तंत्रज्ञानाने पूर्णपणे पाय रोवलेले नाहीत, मात्र काही कंपन्या प्रयत्न करत आहेत.

जाणून घ्या काय आहेत महत्त्वाचे घटक, ज्यामुळे इलेक्ट्रिक कार्स पुढे चालून तुमच्या आमच्यात सामान्य होतील.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)