नॅनो बनवणाऱ्या मराठमोळ्या इंजिनियरने आता आणलीये इलेक्ट्रिक बस!
दिल्लीच्या ऑटो एक्स्पोमध्ये यंदा अनेक फ्युचरिस्टिक गाड्या दिसल्या. इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कॉन्सेप्ट गाड्या आणि एक इथेनॉलवर धावणारी बाईकही दिसली .
यंदा मारुती सुझुकी, होंडा, टोयोटा आणि महिंद्रासारख्या कंपन्यांसोबतच टाटा मोटर्सनेही नव्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आणण्याची तयारी दर्शविली.
आम्ही एक्स्पोमध्ये टाटा नॅनोचे जनक मानले जाणारे गिरिश वाघ यांच्याशी टाटाच्या इलेक्ट्रिक बसविषयी बातचीत केली. टाटा नॅनो तयार करण्याच्या अनुभवापासून ते आता टाटाची इलेक्ट्रिक बस बनवण्याच्या अनुभवाबद्दल ते बीबीसी मराठीशी बोलले.
"भारत सरकारतर्फे FAME योजनेअंतर्गत विविध प्रकारे इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. आणि त्याअंतर्गत 11 शहरं इलेक्ट्रिक बसेससाठी निविदा काढणार असून टाटाही त्यात आपली निविदा भरणार आहे," असं वाघ यांनी सांगितलं.
कशी असणार इलेक्ट्रिक बस? पाहा हा व्हीडिओ.
बीबीसी मराठी प्रतिनिधी गुलशनकुमार वनकर यांचा रिपोर्ट.
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)