न्यूझीलंड मशीद हल्ला: 'त्याचा प्राण जाताना त्याला खूप वेदना झाल्या असतील'
न्यूझीलंडमधल्या ख्राईस्टचर्च हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या कथा हेलावून टाकणाऱ्या आहेत. बांगलादेशचे ओमर फारुक हेदेखील या हल्ल्यात मरण पावले. त्यांच्या पत्नी संजिदा झमान नेहा गर्भवती आहेत. आपल्या पतीचा जीव वाचवता न आल्याची खंत आता त्यांना सतावते आहे.
नेहा यांच्या बाळाच्या जन्मानंतर त्या संपूर्ण कुटुंबासह फारुक यांच्याकडे म्हणजेच न्यूझीलंडला जाणार होत्या. परंतु, त्याआधीच फारुक यांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्यानं त्यांना खूप दुःख झाल्याचं त्यांनी सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)