दारूगोळ्याच्या कोठारावरच वसलंय अफगाणिस्तानातलं 'हे' गाव
अफगाणिस्तानमधून सोव्हिएत युनियननं माघार घेऊन तीस वर्षांचा काळ लोटला आहे. 15 फेब्रुवारी 1989 ला रशियन फौजांनी अफगाणिस्तानमधून माघार घेतली.
या युद्धानं 10 लाख अफगाणी नागकिक आणि 15 हजार सोव्हिएत युनियनच्या सैनिकांचा बळी घेतला. मात्र या युद्धामुळं अफगाणिस्तानातलं एक छोटंसं गाव अजूनही मृत्यूच्या उंबरठ्यावर आहे.
याचं कारण आहे तत्कालिन सोव्हिएत युनियनच्या फौजांनी मागं ठेवलेली शस्त्रास्त्रं. या गावातली घरांसाठी बांधकाम साहित्य चक्क ही क्षेपणास्त्रंच वापरली आहेत. दारुगोळ्याच्या कोठारावर वसलेल्या या गावाचं भवितव्य आता काय असणार आहे?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)