केस कमी वयात पांढरे झाले? तुम्हाला हा आजार असू शकतो - व्हीडिओ
कमी वयात केस पांढरे होणं सामान्य बाब होत चालली आहे. पण हा एक आजार आहे, हे तुम्हाला माहीत आहे?
लवकर केस पांढरे होत असतील तर त्याला वैद्यकीय भाषेत याला केनाइटिस असं म्हणतात. वयाच्या 20 वर्षांआधीचं तुमचे केस पांढरे झाले असतील तर तुम्हाला 'केनायइटिस' असू शकतो.
यामुळे केस काळे करणारे रंगद्रव्यं कमी होतात. अनुवांशिकता, कमी पोषक आहार, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे किंवा हिमोग्लोबीनच्या कमकरतेमुळे केस लवकर पांढरे होतात.
यावर इलाज करणं अवघड आहे. यामध्ये औषधं आणि शँपूचा जास्त फायदा होत नाही. जेवणात बायोटिन पदार्थांचा वापर करा.
केसांवर केमिलकचा वापर करू नका. जास्त शँपूचा वापर टाळा.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)