शरीराबाहेर हृदय असलेल्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया
व्हेनेलोपी होप विल्किन्स जन्माला आली, तिच एका विचित्र शारीरिक अवस्थेत. छातीचं हाड नसल्यामुळं तिचं हृदय शरीराबाहेर होतं. त्यामुळं या नवजात बाळावर तीन शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
तिचं हृदय जागेवर ठेवण्यात डॉक्टरांना यश आलं. तब्बल 14 महिने हॉस्पिटलमध्ये काढल्यानंतर व्हेनेलोपीला घरी सोडलं जाणार आहे. आपल्या चिमुकलीला घरी घेऊन जाण्यासाठी तिचे पालक खूपच उत्साही आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)