अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर व्हेनेझुएला गृहयुद्धाच्या वाटेवर?
व्हेनेझुएलातील अस्थिर परिस्थितीवर लष्करी कारवाईचा पर्यायही आमच्यासमोर आहे, असं विधान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं. त्यानंतर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
'तुमचे हात रक्ताने माखवू नका. लॅटिन अमेरिकेत आणखी एक 'व्हिएतनाम' करून घेऊ नका', असा इशारा मादुरो यांनी ट्रंप यांना दिला आहे. अमेरिकेने आगळीक केली, तर व्हेनेझुएलामध्ये गृहयुद्ध सुरू होईल, असंही ते म्हणाले.
अमेरिकेबरोबरच युरोपियन युनियननेही मादुरो यांना निर्वाणीचा इशारा दिला होता.
पण 'आंतरराष्ट्रीय राजकारणात निर्वाणीचे इशारे दिले जात नाहीत, ते वसाहतवादी मानसिकतेचं प्रतीक आहे,' असं मादुरो यांनी स्पष्ट केलं.
युरोपियन युनियनला 'कॅटलोनियाला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा द्या,' असा निर्वाणीचा इशारा आपण दिला, तर ते चालेला का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)