किडे भागवतील वाढत्या लोकसंख्येची भूक? - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, तापमान बदलाचा सामना करण्यासाठी किडे खाल? - पाहा व्हीडिओ

जगाच्या वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी अन्नधान्याचं उत्पादन वाढवावं लागणार आहे. पण भुकेचा सामना करण्यासाठी किडे उपयुक्त ठरू शकतात, असंही तज्ज्ञांचं मत आहे.

2050पर्यंत जगाची लोकसंख्या 970 कोटीपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एवढ्या लोकसंख्येसाठी अन्नधान्याचं उत्पादन दुपटीनं वाढवावं लागेल.

किडे खाल्ल्यामुळे भुकेचा सामना करण्यासाठी मदत होईल, कारण किडे पोषक असतात. त्यांच्यात प्रथिने असतात आणि ते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, असं तज्ज्ञांना वाटतं. आज जगभरातील 200 कोटी लोक किडे खातात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)