पाकिस्तानात धर्मांतराच्या भीतीने सुरू आहेत हिंदूंच्या वेगळ्या शाळा - व्हीडिओ
इस्लाम हा पाकिस्तानचा राष्ट्रीय धर्म आहे. त्यामुळे तिथे सरकारी शाळांमध्ये इस्लाम धर्माचं शिक्षण दिलं जातं. पण यात धर्मांतराचा धोका असल्याची जाणीव होऊन काही हिंदू तरुणांनी हिंदू विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या शाळा सुरू केल्या आहेत.
दयालू राम नावाचे तरुण शिक्षक पंजाब प्रांतातील एक शाळा चालवतात. आमच्या मुलांना इस्लाम धर्माचं शिक्षण मिळालं, तर भविष्यात ते मौलवींसाठी धर्मांतरासाठी सोपं लक्ष्य असतील, असं ते सांगतात.
या शाळेत मुलांना इतर शिक्षणाबरोबरच गायत्री मंत्र आदींचेही धडे दिले जातात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)