यांच्या बागेत आहेत 40 मगरी...पण का? - पाहा व्हीडिओ

अल्बर्ट यांच्या बागेत 40 मगरी आहेत.

दर 3-4 दिवसांनी ते या मगरींना 5 ते 10 किलो मांस खाऊ घालतात.

"1994 मध्ये राष्ट्राध्यक्ष डॅडाय यांच्या मृत्यूनंतर मी गाटुंबाला आलो. इथं मांसासाठी मगरींना मारलं जातं, हे मी पाहिलं. मी व्यथित झालो आणि त्यांच्या संरक्षणासाठी काम सुरू केलं," ते सांगतात.

"आज माझ्याकडे 45 मगरी झाल्या आहेत. आता आमचं ध्येय आहे की मगरींसाठी सर्वपरीनं विकसित एक जागा असावी. जिथे त्यांचं संवर्धन करून त्यांची संख्या आणखी वाढवता येईल," ते पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)