पाहा व्हीडिओ : अशा चित्तथरारक हवाई कसरती तुम्ही कधी पाहिल्या नसतील
स्वतःभोवती गिरक्या घेणं, कोलांटउड्या मारणं, सूर मारणं, तेही चक्क हवेतल्या हवेत!
अशक्य वाटत असलं तरी या चित्तथरारक हवाई कसरती करून दाखवल्या आहेत अक्रो वर्ल्ड टूर या जागतिक स्पर्धेत.
पॅराग्लायडर्सची ही स्पर्धा जिनिव्हा शहरात झाली.
वेगवेगळ्या कसरती दाखवण्याचे त्यांना गुण मिळतात. खाली पाण्यात एक तराफा असतो, त्यावर व्यवस्थित उतरलात तर जास्तीचे गुण.
समजा पाण्यात उतरावं लागलंच तर मग काहीतरी वेगळं करून दाखवायचं. त्याचे अधिकचे गुण.
यावर्षीच्या अक्रो वर्ल्ड टूर स्पर्धेचे विजेते ठरले स्पेनचे होराशिओ लोरेन्झो.
पाहा त्या स्पर्धेमधली काळजाचा ठोका चुकवणारी काही दृश्यं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)