व्हीडिओ : मुंबईच्या या ‘लेडी गोविंदा’ अशी फोडणार दहीहंडी
दहीहंडी ही काही मुलांचीच मक्तेदारी नाही, त्यात महिला गोविंदा पथकंही जोरदार सराव करून भाग घेतात आणि खेळाचा आनंद लुटतात.
जसजसा हा सण जवळ येत जातो, तशा मुंबईच्या ‘लेडी गोविंदा’ही सरावाला लागतात.
गोविंदा पथकांतील मुलींसाठी दहीहंडी हा एक खेळच नाही, तर व्यक्त आणि मुक्त होण्याचं माध्यमही आहे.
पार्ले स्पोर्टस क्लबच्या गोविंदा पथकाच्या संस्थापक गीता झगडे आणि या पथकातील महिला गोविंदांनी बीबीसी मराठीशी बोलताना दहीहंडीतली महिला पथकं, त्यांचा सराव याबद्दल माहिती दिली.
शूट आणि एडिट – शरद बढे
प्रोड्यूसर – जान्हवी मुळे
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)