पाहा व्हीडिओ : प्लास्टिक करतंय याही पक्ष्याचा घात
शिअरवॉटर हे समुद्र पक्षी आहेत. त्यांची संख्या गेल्या 50 वर्षांत 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्याचं कारण प्लास्टिक!
ऑस्ट्रेलियातले हे शिअरवॉटर पक्षी अस्तित्वासाठी संघर्ष करत आहेत.
टॅसमान समुद्राच्या बेटावर सुमारे ४० हजार शिअरवॉटर्सचं वास्तव्य आहे. पण प्लास्टिकनं त्यांचं अस्तित्व धोक्यात आणलं आहे.
शास्त्रज्ञांची एक टीम त्यांना वाचवण्यासाठी मेहनत करत आहे. त्याबद्दलचा हा व्हीडिओ आहे.
BBC Oneची टीम जगभरात प्लास्टिकच्या दुष्परिणामांचं चित्रण करत आहे.
त्यांच्याच एका डॉक्युमेंटरीमध्ये शिअरवॉटरवरच्या या आघाताचं आणि शास्त्रज्ञांच्या मेहनतीचं चित्रण केलं आहे.
महाराष्ट्रातल्या प्लास्टिक बंदीची सर्वत्र चर्चा असताना ऑस्ट्रेलियातही तशाच स्वरुपाचा निर्णय झाला आहे.
तो ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर नांदणाऱ्या शिअरवॉटरना उपकारक ठरेल का?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)