व्हीडिओ : थायलंडच्या गुहेत अडकलेली मुलं सुरक्षित; पण...

थायलंडच्या गुहेत अडकलेली 12 मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र बाहेर पडण्यासाठी त्यांना डायव्हिंग शिकावं लागेल किंवा पाण्याची पातळी कमी होईपर्यंत गुहेतच वाट पाहावी लागेल.

प्रचंड पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण झाले होते मात्र डायव्हर्सच्या मदतीमुळे मदतपथकांना मुलं आणि प्रशिक्षकांपर्यंत पोहोचण्यात यश आलं.

चार महिने पुरेल एवढं अन्नधान्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लष्कराने स्वीकारली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)