पाहा व्हीडिओ : बंदुकीच्या गोळ्यांमधून महात्मा गांधी साकारणारा अवलिया
वाजिद खान यांना शालेय अभ्यासात कधीच रस नव्हता आणि गतीही नव्हती. त्यांनी शालेय शिक्षणापासून आणि घरातून पळ काढला.
जेमतेम पाचवीपर्यंत शिक्षण झालेल्या इंदूरच्या वाजिद खान यांनी आपल्या चित्रकलेच्या जोरावर जागतिक ख्याती कमवली आहे.
घर सोडल्यानंतर फुटपाथवर राहून, कपडे विकूनही दिवस काढले. त्यांचा त्यांच्या कलेवर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या चित्रकलेच्या जोरावर त्यांनी 32 विश्वविक्रम नोंदवले आहेत. पाहा त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)