पाहा व्हीडिओ : 'डोकं आणि चेहरा न झाकणाऱ्या बाईला लोक निर्लज्ज ठरवून मोकळे होतात'
डोक्यावरून चेहऱ्यापर्यंत पदर किंवा बुरखा घेणाऱ्या प्रत्येक स्त्रीची एक स्वतंत्र कथा आहे. त्यातल्याच 2 भारतीय महिलांची ही गोष्ट.
"डोकं झाकावं. असं चांगलं नाही वाटत... बुजुर्ग सांगतात. बुरखा घातला तर आम्ही मर्यादेत राहतो असं समजलं जातं. पडदा न ओढणारी स्त्री पाहिल्यास लोक तिला निर्लज्ज ठरवून मोकळे होतात," हा एका महिलेचा अनुभव आहे.
"पाणी पितानाही आम्ही बुरखा काढत नाही. कुणीतरी बघेल अशी भीती असते. यातून बघतानाही अडचण होते. चालताना पाय अडकून पडायचा धोका असतो. मर्यादेत राहा, चेहरा झाका, असंच आम्हाला सांगितलं जातं. मग आम्ही तरी काय करणार? असा प्रश्न ही महिला विचारते.
हेही बघितलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)