पाहा व्हीडीओ: 'पाणी काढताना दम लागतो. हातपायाला गोळे येतात'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडीओ: 'पाणी काढताना दम लागतो. हातपायाला गोळे येतात'

सलग चार वर्षं दुष्काळ बघणाऱ्या मराठवाड्यात आजही पाणीटंचाई जाणवते. बहूतांश ठिकाणी सरकारी यंत्रणेच्या ढिसाळ नियोजनामुळे महिलांची पायपीट अजुनही थांबलेली नाही.

बीबीसी मराठीने मराठवाड्यातील पाणीटंचाईचा ग्राऊंड रिपोर्ट करताना याचा सर्वाधिक त्रास सोसणाऱ्या महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. शेतमजुरी करणाऱ्या सीताबाईंना दिवसांतून तीन वेळेस एक ते दीड किलोमीटर लांबून पाणी आणावं लागतं. विहिरीतून पाणी शेंदताना दम लागतो, हातपायाला गोळे येतात असं त्यांनी सांगितलं.

पाणीटंचाईत कोठुनही पाणी मिळवणं एवढंच फक्त नसतं. यातून महिलांना आरोग्याच्याही समस्या भेडसावतात. पण त्याकडे नेहमी दुर्लक्ष होत असल्याचं महिलांशी बोलताना जाणवलं.

रिपोर्टिंग/शुटिंगः निरंजन छानवाल

एडिटिंगः गणेश पोळ

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)