पाहा व्हीडिओ - फेसबुकवर असं काही केलं तर तुमचं अकाउंट बंद होऊ शकतं
गेल्या जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत फेसबुकने काढून टाकलेला, ब्लॉक केलेला मजकूर आणि बनावट खात्यांचा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
या दरम्यान तब्बल 25 लाख हेट स्पीच किंवा समाजात द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट फेसबुकनं ब्लॉक केल्या आहेत. दहशतवादाचा प्रचार करणाऱ्या 19 लाख फेसबुक पोस्टवर कारवाई केली आहे.
58 कोटी 30 लाख बनावट फेसबुक अकाउंट काढून टाकली आहेत. 2.1 कोटी अश्लील पोस्ट ब्लॉक केल्या किंवा काढून टाकल्या.
या कामासाठी AI सिस्टिम आणि 15,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)