वॉलमार्ट-अॅमेझॉनसाठी आता भारत नवी युद्धभूमी
ई-कॉमर्स क्षेत्रात अॅमेझॉनला 'काँटे की टक्कर' देणाऱ्या फ्लिपकार्ट या भारतीय कंपनीला वॉलमार्ट विकत घेणार आहे. फ्लिपकार्ट अमेरिकी जायंट वॉलमार्टला 77 टक्के हिस्सा 16 अब्ज डॉलर्सना (सुमारे एक लाख कोटी रुपये) विकणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बुधवारी या कराराबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.
फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टमध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. फ्लिपकार्ट घेण्यासाठी अॅमेझॉननंही रस दाखवला होता. मात्र, अॅमेझॉनऐवजी फ्लिपकार्टनं वॉलमार्टचा प्रस्ताव स्वीकारला. पण या मोठ्या करारामुळे भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्राचं चित्र कसं बदलेल?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)