Zeebags: प्लास्टिक बॅगविरोधात पाकिस्तानातल्या चिमुकलीचा लढा

व्हीडिओ कॅप्शन, Zeebags: प्लास्टिक बॅगविरोधात पाकिस्तानातल्या चिमुकलीचा लढा

भेटा पाकिस्तानातील झीमल उमेरला. झीमल अवघ्या दहा वर्षं आहे आणि ती Zeebags ची संस्थापक आहे.

पर्यावरणाला धोका असणाऱ्या प्लास्टिक बॅगचा कमीतकमी वापर व्हावा, याकरिता तिने कागदी बॅग तयार करायला सुरुवात केली.

त्यातूनच तिला व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळाली. शालेय शिक्षण पूर्ण करता-करता ती तिचा व्यवसायही सांभाळते. तसंच पर्यावरण रक्षणासोबतच समाजसेवाही करते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)