BBC Innovators : बांगलादेशमध्ये आर्सेनिकयुक्त पाणी कसं शुद्ध करत आहे 'ड्रिंकवेल'

व्हीडिओ कॅप्शन, बांगलादेश : आर्सेनिकयुक्त पाण्यावर 'ड्रिंकवेल'चा पर्याय

बांगलादेशातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यात नैसर्गिकरित्या असलेलं आर्सेनिकचं प्रमाण जास्त आढळून आलं. या आर्सेनिकमुळे अनेकांना फुप्फूस, ह्रदय, त्वचेचे गंभीर आजार होऊ लागले.

यावर तोडगा काढण्यासाठी मूळचे बांगलादेशचे असलेले मात्र अमेरिकेत स्थायिक असलेले मनहाज चौधरी पुढे आले. त्यांनी 'ड्रिंकवेल' हा शुद्ध पाणी पुरवण्याचा प्रकल्प सुरू केला.

या प्रकल्पातील शुद्ध पाणी आता बांगलादेशातील ग्रामीण भागातील नागरिक पिऊ लागले आहेत.

बीबीसीसाठी आमिर रफिक पीरझादा यांचा रिपोर्ट.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)